team jeevandeep 07/05/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.७-
कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्यासह इतर मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील कृषी सहाय्यक संघटनेने सोमवारपासून आंदोलन पुकारले आहे त्यानुसार ठाणे जिल्हा कृषी सहायक संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटना मुरबाड शाखा तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी मुरबाड कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे.
विविध टप्प्यात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे मंडलिक यांनी सांगितले आहे कृषी सहायकांची एकूण ११५२७ पदे अस्तित्वात असून कृषी पर्यवेक्षकांची ,७०० पदे ही मंजूर आहेत त्यामुळे कृषी सहायकांना सेवेची वीस ते पंचवीस वर्षे झाल्यानंतर ही पदोन्नती मिळणार नाही सद्यस्थितीत कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ६:१ याप्रमाणे आहे हे ४:१ याप्रमाणे करण्यात येणे आवश्यक असून त्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे तरी कृषी सहाय्यक ते कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४:१ याप्रमाणे करण्यात यावे कृषी सहायक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे. कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक नियमित कृषी सहाय्यक पदाचे आदेश द्यावे .कृषी सहायकांना लॅपटॉप देण्यात यावे कृषी सहायकांना कायमस्वरूपी मदतनीस द्यावा पोखरा सारख्या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये कृषी सहाय्यक यांना मदतीस म्हणून समूह सहायक द्यावे. कृषी निविष्ठा वाटपाची सुसूत्रता आणावी . असे हे आंदोलनाचे टप्पे ५ मे काळ्याफिती लावून कामकाज ६ मे सर्व शासकीय व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडणे ७ मे सर्व तालुका कृषी अधिकाऱ्याला समोर धरणे आंदोलन ८ मे एक दिवशी सामूहिक रजा ९ मे सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार आणि आणि १५ मे पासून सर्व योजनांचे कामकाज बंद आंदोलन होणार आहे.