Visitors: 226861
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिन कार्यक्रम केडीएमसीत उत्साहात साजरा

  Team jeevandeep      01/05/2025      sthanik-batmya    Share


1005608376 

कल्याण : महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिन कार्यक्रम आज कल्याण डोंबिवली महापालिकेत उत्साह संपन्न झाला. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका मुख्यालयात ध्वजवंदन केले. यावेळी राष्ट्रगीत गायन झाल्यावर शासन निर्णया नुसार राज्यगीताची ध्वनिफीत वाजवण्यात आली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त वंदना गुळवे, अतुल पाटील, प्रसाद बोरकर, संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत , शैलेश कुलकर्णी व इतर अधिकारी वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.

 महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे, त्यांचा आदर्श आपण पुढे ठेवला पाहिजे. या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. संविधानाच्या मूल्ये, आदर्श प्रत्येक नागरिकाने जतन करायला हवे. ही मूल्ये आपल्या मधे रुजवायला हवीत आणि आपला महाराष्ट्र, भारत देश प्रगती पथावर जाईल यासाठी, राज्याच्या, देशाच्या विकासाठी प्रत्येक नागरिकाने  हातभार लावावा असे आवाह

या वेळी केंद्र शासनाच्या "पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेचा" प्रसार आणि प्रचार करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. सौर ऊर्जा ही हरित ऊर्जा असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी तिचा वापर करावा या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याच्या अनुषंगाने हे माहितीपत्रक तयार करून त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. 

महापालिकेच्या डोंबिवली विभागातही  अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या हस्ते आज ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपायक्त रमेश मिसाळ, सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, राजेश सावंत, उप अभियंता अजय महाजन, महेश गुप्ते तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 त्याचप्रमाणे दत्तनगर, डोंबिवली (पूर्व )येथील १५० फुटी ध्वजाचे ध्वजवंदन आज महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सहाय्यक आयुक्त संजय कुमार कुमावत, उप अभियंता वसईकर, नाखवे व इतर अधिकारी आणि कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

 

+