Visitors: 229982
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

महायुतीत नाराजी ! फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना दे धक्का; आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, अजित पवारांना घेतले

  TEAM JEEVANDEEP      10/02/2025      sthanik-batmya    Share


या समितीतमहसूल, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे, मात्रनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेया समितीत नसल्यानेशिवसेनेच्या नेत्यांमध्येनाराजी पसरली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळत मतदारांनी थेट त्यांना बहुमतापर्यंत पोहोचवल्याने महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कमी महत्व प्राप्त झाले. बदललेल्या परिस्थितीत अजित पवारांनी मिळेल त्यात जुळवून घेत भाजपशी जवळीक साधली. मात्र पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारून दरे या गावात जात आहेत. त्यातच आता भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याचे संकेत देणारी बातमीसमोर आली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून (Disaster Management Committee) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलं आहे.

चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपविली होती. एकनाथ शिंदेंसाठी हा धक्का असल्याचे मानले जात असतानाच आता आणखी एक धक्का शिंदे गटाला बसला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सुत्रे आपल्याकडे घेतली असून या समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले आहे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्णी लागली आहे. या समितीत महसूल, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे, मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या समितीत नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याची भूमिका महत्त्वाची असते. या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि मदत घटनास्थळापर्यंत पोहोचवली जाते. तरीही या समितीत नगरविकास खात्यांच्या मंत्र्यांना न घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामागे फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष असल्याचे बोलले जात आहे.

+