Visitors: 234507
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मनसेच्या वतीनेन कल्याणमधील सुभाष मैदान बचाव मोहीम

  team jeevandeep      18/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण पश्चिमेतील कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाला लागून असलेल्या सुभाष मैदानात इनडोअर गेमसाठी हॉल बांधण्यात येणार असून या हॉलला सर्व खेळाडुंनी विरोध केला असून आहे त्या मैदानात हा हॉल न उभारता मैदानाव्यतिरिक्त इतर जागेत हा हॉल उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे हे सुभाष मैदान वाचविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहिल्याबाई चौक शाखा अध्यक्ष संदिप पंडित यांच्या वतीने सुभाष मैदान बचाव मोहीम छेडण्यात आली असून जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

    ऐतिहासिक कल्याण नगरीत सर्वसामान्यांसाठी 'सुभाष मैदान' हे एकमेव मोकळा श्वास घेण्याची जागा उरलेली आहे. या मैदानात क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल असे नानावीविध खेळ खेळले जातात. सर्वसामान्यजण तेथे मॉर्निंग वॉक, व्यायाम तसेच धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून येत असतात. मुळात सुभाष मैदान तसे फार मोठे मैदान नाही. आता यात 'इनडोअर गेम' साठी म्हणे 'मल्टीपर्पज हॉल' बांधण्याचा घाट महापालिका वर्तुळात सुरू असल्याची चर्चा आहे.

नक्षत्र उ‌द्यानाच्या गेट पासून मैदानाच्या ३५ टक्के या दरम्यान हा हॉल होणार आहे. पण यामुळे मुळातच छोटे क्षेत्रफळ असलेल्या सुभाष मैदानाची जागा आक्रसणार आहे. परिणामी अत्यंत गैरसोय होणार असा जनअक्रोश आहे. या विकास यात्रेला, योजनांना, सुविधांना विरोध नाही. पण हे नियोजन करताना नागरिकांची गैरसोय तसेच नुसते अडथळे होऊ नयेत. 'मल्टीपर्पज हॉल' अन्यत्र व्हावा, ज्यामुळे सुभाष मैदानाची जागा विनाकारण आक्रसली जाऊ नये ही मनसेची भूमिका आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे मन भूमिका याचा सारासार विचार न करता सुभाष मैदानातच 'मल्टीपर्पज हॉल' हा उपक्रम महापालिका लादणार असेल तर नाईलाजास्तव जन आंदोलन करणे भाग पडेल याची दखल महानगरपालिकेने घ्यावी असा इशारा मनसेचे शाखा अध्यक्ष संदिप पंडित यांनी दिला आहे. 

+