Visitors: 229969
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

मनसेचे अंबरनाथ नगरपरिषदेत कचरा फेको आंदोलन !!!

  team jeevandeep      24/02/2025      sthanik-batmya    Share


उल्हासनगर  :

गेले तीन महिने वेतन न मिळाल्याने अंबरनाथ नगर परिषदेतील कंत्राटी  सफाई कामगारांनी अचानक काम बंद केलंय . यामुळे शहरभरात कचऱ्याचे ढिगारे साचू लागले आहेत. नागरिकांना दुर्गंधी आजारांचा त्रास सोसावा लागत आहे. शहरातील कचरा उचलण्याची तात्काळ नगर परिषदेने व्यवस्था न केल्यास मनसेच्या वतीने कचरा नगरपरिषदे च्या आवारात आणून टाकणारे  कचरा फेको आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक एड.  स्वप्निल बागुल यांनी दिला आहे.

             बागुल त्यांनी नगरपरिषदेस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की,  अंबरनाथ नगरपरिषद मोठ्या थाटामाटात अंबरनाथ विकासाचा पॅटर्न टूम वाजवते आणि मोठ मोठ्या जाहिरातबाजी करते. पण, प्रशासकीय राजवटीत सर्व सामान्य नागरिकांच्या मूलभूत सेवा सुविधा मात्र पूर्णतः दुर्लक्षित आहेत. आपल्या दैनंदिन कचरा संकलन करणारे कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी हे अतिशय महत्वाचे काम करतात, आपण कचरा दिसला ही नाकावर रुमाल लावून पुढे जातो.

 कित्येक करोड रुपये खर्च करून, असा  बेगडी विकासाचा पॅटर्न शहरात काय कामाचा जर शहरात स्वच्छता आणि मूलभूत सुविधाच नाहीत. त्यामुळे  नको तो विकासाचा अंबरनाथ पॅटर्न जिथे कचरा आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नाही. येत्या ३ दिवसांत आपण शहरातील कचरा समस्या मार्गी न लावल्यास अंबरनाथ नगरपरिषदेत शहरातील कचरा जमा करून निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वप्निल बागुल यांनी दिला आहे.

+