Visitors: 391063
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मनपाने तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर दिलेल्या इमारती कचऱ्याच्या विळाख्यात

  team jeevandeep      03/04/2025      sthanik-batmya    Share


ठाणे : प्रतिनिधी

स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे ब्रीद वाक्य खरे ठरविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी असलेले अनेक कचरा डेपो बंद करून स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. दंडात्मक कारवाई सुद्धा केली जात आहे. सध्या ठाणे शहर हे कचऱ्याचे शहर अशी ओळख निर्माण होत असताना महिन्यांपासून कचरा डेपोचा विषय चर्चेचा विषय बनला आहे. वेळेवर कचरा न उचलल्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर दुपारी 12.30 ते 2.30 च्या दरम्यान

कचरा घेऊन जाणाऱ्या गाड्या रस्त्यावरती असतात आणि त्याची दुर्गंधी इतक्या प्रमाणात असते की रस्त्यावरून प्रवास करत असताना हातात नाक धरून प्रवास करावा लागतो.

     ठाण्यातील कोरस रोड, वर्तकनगर परिसरात ठिकठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याने कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे.  कोरसरोड, वर्तकनगर परिसरात ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरातील प्रकल्प, धोकादायक इमारत, रस्ता रुंदीकरण यामध्ये बाधित झालेल्या बाधितांना तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर रेंटल हाऊसिंग इमारतीमध्ये सदनिका देण्यात आलेले आहेत. अशा चार इमारतीच्या बाजुला आणि कोरस रोड रस्त्यावर परिसरातील नागरिकांडून कचरा टाकला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे टाकलेला हा कचरा इतरत्र उडत आहे. येथेच बस थांबा आहे. या ठिकाणी सकाळच्या वेळे

वेळेत शाळेत जाणारे विद्यार्थी, पालक, कामानिमित्त घरातून बाहेर निघणारे नागरिक यांना सकाळी या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या सदनिकातील नागरिकांची सकाळ कचऱ्याच्या दुर्गंधीने होत आहे. या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्याकडे ठामपा अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. येथील कचऱ्याच्या दुर्गंधीचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असून त्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे कायम कचरा टाकला जातो. येथे कसल्याही प्रकारची कचराकुंडी नाही. तसेच या कचऱ्याच्या बाजूला परिसरात सुरू असलेल्या इमारतीचे रॅबिट व घरातील इतर कचरा अनेक दिवसांपासून धूळखात पडलेला आहे. याकडे सुद्धा कुणाचं लक्ष नाही. ही कचऱ्याची समस्या सुटण्यासाठी ठाणे महानगरपालिका घनकचरा विभागाचे अधिकारी, विभागाचे लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येवून या प्रश्नावर चर्चा करून कायम स्वरूपाचा मार्ग काढणे गरजेचे आहे. 

   परिसरातील रहिवाशांकडून प्लास्टिकच्या पिशव्या, भाजी-पाला पोत्यांमध्ये बांधून येथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे तो त्यातच कुजतो, सडतो आणि तेथेच साचून राहतो. त्याचे प्रमाण इतके जास्त आहे की, दिवसभरातच येथे कचऱ्याचे ढिग साचतात. हा कचरा रोज उचलला जात असला तरी या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. अतिशय कुबट, सडलेल्या पदार्थाचा वास या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना त्रासदायक ठरतो. येथील रहीवाशांना तर तो कायमचा मनस्ताप ठरत आहे. येथून वावरताना नाकावर हात ठेऊनच चालावे लागते. या कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या कचऱ्यावर वावरणारी भटकी कुत्री, जनावरे, वेगवेगळे पक्षी यांच्यामुळे परिसरात घाण आणि संसर्ग पसरत आहे. ठाणे महानगरपालिका घनकचरा विभागाचे अधिकारी यांचे  कडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी संबंधीत प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता याची गांभिर्याने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

    तसेच वागळे इस्टेट परिसरातील इंदिरा नगर, रोड नंबर 33 व आंबेवाडी येथे वर्षानुवर्षाचा रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यावरती उघड्यावर कचरा डेपो आहे. या ठिकाणी भाजी व मच्छी मार्केट मधील ओला सुखा कचरा व मार्केट मधील भाज्या  टाकल्या जातात आणि हा कचरा ओला असल्यामुळे यामधून फार दुर्गंधी येते. या रस्त्यावरून जात असताना येथील प्रवाशांना वाहनचालकांना नाक हातामध्ये धरून प्रवास करावा लागत आहे.  या कचराऱ्यामुळे परिसरात डेंगू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची शक्यता आहे. तसेच या कचऱ्यामध्ये पक्षी, गाय, डुक्कर अशा जनावारांचा वावर वाढला आहे. या घाणीचे साम्राज्यामुळे परिसरातील रहीवाशी आपला जीव मुठीत धरुन जीवन जगत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष न करता येथील कचरा वेळेवर उचलावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

+