Visitors: 226312
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

  Team jeevandeep      17/05/2025      sthanik-batmya    Share


Dinesh Tawade 

कल्याण :  कल्याण शहरातील भारतीय जनता पक्षाच्या सर्वात जुन्या आणि कट्टर कार्यकर्त्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या दिनेश तावडे यांचे आज शुक्रवारी  सकाळी निधन झाले. नेहमीप्रमाणे भगवा तलाव येथे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

दिनेश तावडे यांनी 1974 पासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या समाजकारण आणि राजकारणाला प्रारंभ केला. आपल्या कुशल नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी सामान्य कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी मोठी झेप घेतली. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्यनगरसेवक आणि विरोधी पक्षनेता अशी पदही त्यांनी भूषवली. तर आणीबाणीच्या काळातही त्यांनी तितक्याच आत्मियतेने पक्षाचे काम केल्याची आठवण त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी करून दिली. अशा जुन्या फळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या निधनामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतेपदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सायंकाळी कल्याण पश्चिमेतील लालचौकी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह, सामाजिक तसेच सर्व क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. 

+