Visitors: 391461
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

बापाची साथ शेवटपर्यंत सोडू नका- अनिल बोरनारे कल्याणमध्ये रंगले बापावरील राज्यस्तरीय कवी संमेलन

  team jeevandeep      24/03/2025      sthanik-batmya    Share


कल्याण (प्रतिनिधी) बाप जीवंत असेपर्यंत परिस्थितीचे काटे आपल्या पायापर्यंत पोहचत नाही बापाला तुमच्या संपतीचा वाटा नको असतो हवं असते प्रेम म्हणून या बापाची शेवटपर्यंत साथ सोडू नका असे आवाहन मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष व भाजप प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केले 

कल्याणमधील वैष्णवी लान्स च्या सभागृहात जिजाई सेवा बहुउद्देशीय संस्था व कवी व्याख्याते संदीप ईश्वर पाटील व कल्पना संदीप पाटील यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बोरनारे बोलत होते यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार हभप सत्यवान पाटील राजेंद्र पाटील शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत भामरे आदी उपस्थित होते 

या कविसंमेलनाला राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कवी कवियित्रीनी बापावरील कर्तृत्वाच्या कविता सादर केल्या सर्व कविंना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले

बापाच्या कर्तृत्वाचं मोजमाप कोणत्याही कविता कादंबरीतून करता येणार नाही एव्हढं मोठं कर्तृत्व बापाचं असतं. आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी तो एक दिपस्तंभ असतो. मुलांच्या हट्टाला तो कधीही नकार देत असल्याने अनेक मुलांना त्याची किंमत नसते असे परखड मत अनिल बोरनारे यांनी व्यक्त करून राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील तरुणांसाठी बापा च्या कर्तृत्वावर राज्यस्तरीय कविता लेखन करण्याची सूचना अनिल बोरनारे यांनी आयोजकांना केली.

+