Visitors: 229743
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

बनावट फोन पे द्वारे दुकानदारांची फसवणूक करणारी दुकली गजाआड

  team jeevandeep      10/03/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : बनावट फोन पे अॅपवर पैसे पाठवल्याचे दाखवून किराणा दुकानदारांना गंडा घालणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे.

कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 26 फेब्रुवारी रोजी दुपारी कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका येथील आर. के. बझार या सुपर मार्केटमध्ये दोन इसम येवुन त्यांनी फिर्यादी यांच्या सुपर मार्केट मधुन किराणा सामान मधील ६२९३/- रू. किमंतीच्या वस्तु विकत घेतल्या. फिर्यादी यांच्या भावाला ऑनलाईन बिल भरतो असे सांगुन त्यांनी हे बिल अदा केल्याबाबत बनावट फोन पे अॅपवर दाखवुन बिल पेड न करता फिर्यादी यांची फसवणुक केली. याबाबत  विशाल बोडके यांच्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

या दाखल गुन्हयाचा कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वपोनि गणेश न्हायदे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोउपनिरी सिराज शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि दर्शन पाटील व त्यांच्या  पथकाने गुन्हयाचा तांत्रिक तपास करून या गुन्हयातील फसवणुक करून गेलेले आरोपी पंकज पाटील, वय २२ वर्षे, व अनिल कांबळे, वय २४ वर्षे, दोघेही राहणार ठाणे  या दोन आरोपीना अटक केली. त्यांच्याकडे सखोल तपास करून कोळसेवाडी पोलीसस्टेशन व मानपाडा पो.स्टे. येथे दाखल गुन्हयातील मुदद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींच्या ताब्यातुन एकुण १६ हजार ४५५ रू. किमंतीचा  किराणा माल वस्तु व एकुण चार मोबाईल फोन असा मुदद्दे‌माल जप्त केला आहे.

हि कारवाई पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे  व सहा. पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या  मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वपोनिरी. गणेश न्हायदे, पो.निरी प्रशासन नाईक यांच्या  सूचनेप्रमाणे सहा. पो निरी दर्शन पाटील, पोलीस उप निरीक्षक सिराज शेख, पोहवा  बोरसे, सांगळे, कापडी, जरग, सांगळे, पोशि सोनावळे, गिते यांच्या पथकाने केली आहे.

+