team jeevandeep 02/03/2025 sthanik-batmya Share
आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ठाणे येथील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाला भेट
ठाणे : प्रतिनिधी
शिक्षकांना एकत्रितपणे प्रयत्न व क्षमतांचा वापर करून आपल्या शाळेचे नावलौकिक वाढवावे. अशा प्रशिक्षणांमधून शिक्षकांचे नेतृत्व गुणांचा विकास होतो. दोन वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत ठाणे,पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या पाचही जिल्ह्यांमध्ये 25 कोटी रुपयाचे डिजिटल शैक्षणिक साहित्य आणि सोलर पॅनलचे वाटप आपण केले. यापुढील कालावधीत कोकण विभागातील सर्व शाळा, तंत्रस्नेही अद्ययावत करण्याचे आपले ध्येय आहे असे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करताना कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 44, वर्तकनगर, ठाणे येथे संपन्न झालेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण केंद्राला कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी दि.01 मार्च 2025 रोजी सदिच्छा भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी गट प्रमुख अनघा पालांडे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, मनोहर पाटकर, जगन्नाथ जाधव, प्रशिक्षण समन्वयक दिलीप शेवाळे, सविता गोसावी, महेंद्र राऊत उपस्थित होते. तसेच मनिषा राजपूत, वर्षा कदम, मयुरी देवकर, सचिन घोडे, शोभा लोखंडे, मयुरी कदम, मनिषा खताळ, शारदा चौधरी, सिध्दी नाईक, शिल्पा टेंबे, विद्या चव्हाण, मारुती कचरे यांनी सुलभक म्हणून काम पाहिले. प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी आपल्या समस्या समोर मांडल्या. सदर समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्याचे आश्वासन आ.म्हात्रे सरांनी दिले.