team jeevandeep 21/04/2025 sthanik-batmya Share
वासिंद (प्रतिनिधी )-
नागरीकांच्या असलेल्या समस्या व तक्रारी निवारणासाठी पडघा, भिवंडी तालुका व गणेशपुरी या पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या वेळेत भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशपुरी पोलिस उपविभागीय अधिकारी अंतर्गत असलेल्या भिवंडी तालुका, पडघा, गणेशपुरी या पोलीस ठाण्यात भिवंडी ग्रामीण भागातील पडघा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच तक्रारींच्या निवारणासाठी कार्यालयात प्रत्येक सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 02 वाजे पर्यंत हजर असणार आहे.
त्यामुळे या असलेल्या समस्या व तक्रारी निवारणासाठी नागरिकांनी दिलेल्या वेळेत त्यांच्या पोलीस ठाणे कार्यालयात भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती पडघा पोलिस स्टेशन पोलिस सुत्रांनी दिली.