team jeevandeep 02/05/2025 sthanik-batmya Share
पेण(प्रतिनिधी) :
पोलिस दलात कार्यरत असताना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेवून पोलीस महासंचालक बोधचिन्ह पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
यंदाचा हा मानाच्या पुरस्कार पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांना आज १ मे महाराष्ट्र दिनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
पोलिस निरीक्षक संदीप बागुल
यांनी यापूर्वी ठाणे येथील गुन्हे शाखेत काम करत असताना अनेक यशस्वी तपास केले आहेत. पेण पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या काही महिन्यांमध्ये अनेक गुन्हे हाताळून त्या घटनांचा यशस्वी छडा लावला आहे.अनेक गुन्हे काही तासांच्या आत उघड केले, तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना वाचवून संसार उध्वस्त होण्यापासून देखील त्यांनी वाचवले आहेत. त्यांच्या पेणमधील कामगिरीमुळे अनेक ठिकाणी गुन्-हेगारीला आळा बसला आहे. त्यांचे पेण तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.