team jeevandeep 30/04/2025 sthanik-batmya Share
पेण (प्रतिनिधी) :
मराठी साहित्य मंडळ पेण आणि अहिल्या महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी माध्यमातून शिकलेल्या आणि जीवनात यशोशिखर गाठणाऱ्या तीन व्यक्ती रेखांच्या 'उत्तुंग' मुलाखतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.डॉ.गीता वनगे (शास्त्रज्ञ),उदय साठे(बिल्डर डेव्हलपर) आणि हेमंत म्हात्रे (उद्योजक) आदींचा जीवन प्रवास उपस्थितांना ऐकता आला.मुलाखतकार म्हणून अश्विनी गाडगीळ आणि विनायक गोखले यांनी निमंत्रितांना विविध विषयांवर बोलते केले.कार्यक्रमाच्या सुरवातीला मराठी साहित्य मंडळ अध्यक्ष डॉ.देवीदास बामणे यांनी पुस्तक स्वरूपात भेट वस्तू देऊन निमंत्रितांचे स्वागत केले.कार्यक्रमास मराठी साहित्य मंडळ पेण सचिव वैभव धनावडे,माजी अध्यक्षा विभावरी जोशी,माजी सचिव बाळकृष्ण कमळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पेण मधील डॉक्टर,बिल्डर,वकील,व्यावसायिक आणि विविध कार्यक्षेत्रात आपले विशेष योगदान देत राहणाऱ्या व्यक्तींची उपस्थिती कार्यक्रमास लाभली.
मराठी शाळांमधून शिकवून अपार मेहनत,सातत्य या जोरावर
यश सहज प्राप्त करता येते हा संदेश देताना आपल्या यशात आपले कुटुंब आणि मार्गदर्शक यांचा मोलाचा वाटा आहे असे निमंत्रितांनी बोलून दाखविले.