team jeevandeep 26/04/2025 sthanik-batmya Share
पडघा दि. २६ (प्रतिनिधी)
वाढत्या नागरीकरणामुळे चर्चेत असलेल्या भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे भुमीपुजन विवीध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले.
सरपंच रविंद्र विशे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन सरपंच विशे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत निधीतुन पडघा गावातील मणीयार आळी, अचानक नगर, राजेश गवळी यांच्या घराच्या मागील बाजूस पेव्हर ब्लॉक, रस्ता तयार करणे व जनसुवीधा योजनेंतर्गत पडघा- भादाणे रस्त्यावरील श्री समर्थ बैठक हॉलसमोर पेव्हर ब्लॉक रस्ता, नवीन आर. सी. सी. स्मशानभूमी तयार करणे ही कामे प्रस्तावित असुन या विकासकामांचे भुमीपुजन शिवसेना नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर, सरपंच रविंद्र विशे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले या विकासकामांमुळे नागरीकांना याचा फायदा होणार आहे. तर सरपंच रविंद्र विशे व ग्रामपंचायत कमीटी गावात करीत असलेल्या विकासकामांचे शिवसेना नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे यांनी कौतुक करुन रवींद्र विशे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती (पुतळा) भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच निता दास ग्रामपंचायत सदस्य, शैलेश बिडवी, अभिषेक नागावेकर, मयूरेश गंधे, रश्मी तेलवणे,नयना जाधव, सायली पाटील, ग्रामपंचायत अधीकारी भास्कर घुडे, पडघा सोसायटीचे माजी सभापती गुरूनाथ मते, माजी सरपंच शंशाक तांबोळी, संजय जाधव, प्रताप विशे, रूपेश तेलवणे, अविनाश दास, गुरूनाथ मोरे उपस्थित होते.