Visitors: 391570
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून मिळाला अनेकांना रोजगार

  Team Jeevandeep       12/03/2025      sthanik-batmya    Share


IMG-20250310-WA0064 

कल्याण : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे, आसरा फाउंडेशन आणि मित्र मेळा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन श्री मावळी मंडळ हायस्कूल, ठाणे येथे करण्यात आले होते.

'कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र' या ध्येयाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात अनेक नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये थेट नोकरीच्या मुलाखती (ऑन द स्पॉट जॉब इंटरव्ह्यू) घेतल्या गेल्या. ज्यामध्ये ठाण्यातील अनेक युवकांनी सहभाग नोंदवला. शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार संजय केळकर व आसरा फाऊंडेशनचे विश्वस्त पद्मश्री उदय देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा कौशल्य रोजगार विभाग ठाणे सहआयुक्त संध्या साळुंखे, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, इंटरनॅशनल लाईफ कोच पवित्रा सावंत, आसरा फाऊंडेशनचे विश्वस्त प्रदीप पाटील, मित्र मेळा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शंकर संकपाळ, स्नेहा पाटील,  डॉ. राजेश मढवी, महेश कदम, सिताराम राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

+