team jeevandeep 29/03/2025 sthanik-batmya Share
मुरबाड-प्रतिनिधी :
मुरबाड तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या नारिवली ग्रामपंचायती च्या रिक्त असलेल्या सरपंच पदी नवयुवक योगेश भाऊ भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. योगेश भोईर हा एक सामान्य कुटुंबातील सुशिक्षित तरूण असून त्यांचे माता पित्याचे छत्र हरपले असताना सुद्धा आपल्या गावासाठी काम करण्याची त्यांची लहानपणापासून ईच्छा होती.मागिल निवडणूकीत गावाने त्यांना सदस्य म्हणून निवडून दिले होते तर आज त्यांची संपूर्ण गृप ग्रामपंचायतीने बिनविरोध सरपंच करून त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. लहानपणापासून त्यांच्यावर तालुक्याचे माजी सभापती व बँकेचे संचालक उल्हासभाऊ बांगर यांचा राजकीय सहवास लाभला असून यापुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गावासाठी विकास कामे करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीमुळे उल्हास बांगर यांच्या सह नारिवलीच्या माजी सरपंच हर्षला भोईर, अर्चना भोईर, भास्कर बांगर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर यावेळी नवनिर्वाचित सरपंचांनी सर्व सदस्यांचे , ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.