team jeevandeep 17/02/2025 sthanik-batmya Share
पालघर /अंजली अनंत घाडी 11 6/ 2024 N.s.facilty मध्ये कामाला होत्या,त्याच दोन महिन्याचा पगार बाकी होता. आज देतो उद्या देतो असं करून हा पगार फेब्रुवारी 2025 पर्यंत दिला नव्हता त्यानंतर अंजली गाडी यांनी मित्राच्या सहाय्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखाप्रमुख प्रवीण पालव, रुपेश मोरे आणि सुधीर गुरव यांच्याशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली. व प्रवीण पालव यांनी त्या कंपनीमध्ये जाऊन त्यांच्या सुपरवायझ व वरिष्ठांशी बोलणं करून इतके महिने न देणारा पगार तीन दिवसात अंजली गाडी यांना देण्यात आला. गाडी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. मराठी माणसाला त्याचा हक मिळवून देणारा एकच पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी भावना अंजली गाडी यांनी व्यक्त केली.