team jeevandeep 12/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलीसांनी उल्हासनगर येथुन अटक केली असून त्यांच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
मानपाडा पोलीस स्टेशनच्या हददीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.निरी. विजय कादबाने यांनी मानपाडा ठाणेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करून त्यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सुचनांप्रमाणे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तपास करीत असतांना आरोपींबाबत सपोनि संपत फडोळ यांना बातमीदाराकडुन खात्रीशिर बातमी प्राप्त झाली.
मिळालेल्या गोपनिय बातमीदाराच्या आधारे सपोनि संपत फडोळ व गुन्हे प्रकटीकरण पथक असे उल्हासनगर येथे रवाना होवून अहोरात्र मेहनत घेवून सराईत आरोपी रितिक बाविस्कर वय १९ वर्षे आणि कुणाल नायडु वय १९ वर्षे यांना उल्हासनगर येथुन ताब्यात घेवून त्यांना अटक करून त्यांच्याकडुन मानपाडा पोलीस ठाणे, कोळसेवाडी पोलीस ठाणे व एनआरआय पोलीस ठाणे, नवी मुंबई येथील एकुण ४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
या अटक आरोपींकडुन चोरी झालेल्या चार मोटारसायकल असा एकुण रक्कम २ लाख ७० हजार रू. किमंतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अटक आरोपी हे मोटारसायकल सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी ठाणे आयुक्तलयात आरोपीत कुणाल नायडु यास एकुण २ गुन्हयात अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मानपाडा पोलीस स्टेशन, कोळसेवाडी आणि एनआरआय पोलीस स्टेशन येथील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
हि कामगिरी वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि (गुन्हे) राम चोपडे, पोनि (का व सु) जयपालसिंह गिरासे, पोनि (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सपोनि संपत फडोळ, सपोनि महेश राळेभात, पोहवा सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिलारे, सचिन साळवी, पोना गणेश भोईर,
यलप्पा पाटील, कृष्णा बोन्हाडे, पोशि विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके, नाना चव्हाण, गणेश बडे, घनश्याम ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.