Visitors: 234459
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि पुनर्वसन केंद्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केडीएमसी क्षेत्रातील दिव्यांगांना मिळणार मोफत सुविधा

  team jeevandeep      18/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

   कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सुमारे 5 हजार 500 दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केलेली आहे. या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजीओथेरेपीची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामुल्य उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून काढलेल्या निविदेला महापालिका आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड़ यांनी मंजुरी दिल्याने या कामाचे कार्यादेश "आधार रिहॅबिलेटेड सर्विसेस" यांना देण्यात आले. 

 या केंद्राचा  लोकार्पण सोहळा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते  फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्र  (महिला कल्याण केंद्र),  सांगळे वाडी, कल्याण (प.)येथे संपन्न झाला. यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, केडीएमसी सचिव किशोर शेळके,  पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, समाज विभागाचे उपायुक्त संजय जाधव, प्रशांत गवाणकर, शिवसेना  शहर प्रमुख रवी पाटील, निलेश शिंदे, उपशहर प्रमुख मोहन उगले, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, आधार रिहॅबिलेटेशन सर्व्हिसेसच्या संचालक डॉ. सोनल सिंग, व्यवस्थापक जयंत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या केंद्रांमध्ये दिव्यांग नागरीक जे अंधत्व, बुटकेपणा, मतिमंद, स्नायु दौर्बल्य, सेरेब्रल पाल्सी, मानसिक आजार, स्वमग्नता ,अध्ययन अक्षमता, थैलेसेमिया, सिकल सेल अनेमिया, वाचादोष, बहुविकलांगता, कर्णबधिरता  हिमोफिलीया, लोकोमोटर डिसॅबिलीटी इत्यादी व्याधींनी पिडीत आहेत, अशा दिव्यांग व्यक्तींना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत  आधार रिहॅबिलेटेड सर्विसेस यांच्या माध्यमातुन तदअनुषंगिक आरोग्य सुविधा निःशुल्क पुरविण्यात येणार आहेत.

दिव्यांग व्यक्तींसाठी पहिल्यांदाच हे फिजिओथेरपी सेंटर कल्याणमध्ये सुरू झालं आहे. खाजगी ठिकाणी गर्दी खूप असते आणि पैसे देखील जास्त असतात. 7 हजार स्क्वेअर फूट जागेत हे सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरचा लाभ केडीएमसी क्षेत्रातील नागरिकांना मोफत असून इतर ठिकाणच्या लोकांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार आहेत. बदलापूर, अंबरनाथ उल्हासनगर आदी ठिकाणचे पेशंट देखील याठिकाणी येतील अशी माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.

 

+