Visitors: 389949
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

दत्तात्रय दिनकर यांची बिनविरोध निवड

  team jeevandeep      09/05/2025      sthanik-batmya    Share


शहापूर :

       तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या किन्हवली सहकारी भात गिरणीच्या संचालक मंडळाच्या २०२५/२६ ते २०३०/३१ च्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील दिग्गज असलेले माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दिनकर यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

      शहापूर तालुक्यातील मातब्बर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते,कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांचेकडून सहकार क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त  व्यक्तिमत्व,खरेदी विक्री संघांचे माजी सभापती व विद्यमान संचालक, अस्नोली गावचे माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय मंगल दिनकर यांची किन्हवली शेतकरी सहकारी राईस मिलवर ओबीसी गटातून बिनविरोध संचालक पदी निवड करण्यात आली. किन्हवली पंचक्रोशीतील अनेक दिग्गजांनी  दत्तात्रय दिनकर यांचा अनुभव पाहून आपले उमेदवारी अर्ज माघारी घेऊन त्यांची बिनविरोध निवड केली.दरम्यान किन्हवली राईस मिलच्या  मतदारांचे व संचालकांचे दत्तात्रय दिनकर यांनी आभार मानले.दरम्यान सदर निवणूकीचे मतदान १४ मे २०२५ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेदरम्यान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

+