Visitors: 226865
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

डोंबिवलीत महिलांकरिता कामगार नोंदणी सर्टिफिकेट उपक्रम

  team jeevandeep      29/04/2025      sthanik-batmya    Share


डोंबिवली .....

महिलांनी स्वावलंबी व्हावे, आर्थिकदृष्या  सक्षम व्हावे हा उद्देश समोर ठेवून माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर संघटक रणजित जोशी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम हाती घेता. सोमवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात घरकाम मजदुर महिला व रिक्षा चालक महिलांसाठी कामगार नोंदणी सर्टिफिकेट उपक्रम केला. या उपक्रमत गरजू महिलांनी हजेरी लावून कामगार नोंदणी अर्ज भरून या याजनेचा फायदा घेतला.

पश्चिम विभागात शास्त्रीनगर, देवी चौक येथील जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती गरजू महिलांनी दिली. त्याप्रमाणे रिक्षा योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होते. यामध्ये महिलांसाठी मोफत रिक्षा ड्रायव्हिंग कोर्स तसेच खरेदीसाठी सबसिडी शासकीय प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्यात आली. तसेच घर काम करणाऱ्या मजदुर महिलांकरिता कामगार नोंदणी सर्टिफिकेट अर्ज भरून घेण्यात आले. या उपक्रम अंतर्गत आरी वर्क कोर्स व फॅब्रिक पेंटिंग कोर्स महिलांसाठी मोफत ठेवण्यात आले होते त्याचाही फायदा महिलांनी घेतला. शिवाय महिलांसाठी खास गार्नियर कंपनीच्या हेअर कलर मोफत ठेवण्यात आला होता त्याचा फायदाही सुमारे चारशे महिलांनी घेतला. महिलांचे असे आवडते उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाखाप्रमुख वैशाली पेणकर, उपशाखाप्रमुख ज्योती औटी, अश्विनी आनंद, जान्हवी बापर्डेकर यांचं विशेष योगदान लाभलं.

+