Visitors: 229303
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रा : चित्ररथांच्या माध्यमातून साकारले जाणार समृध्द संस्कृती जीवनाचे पंचसूत्र

  team jeevandeep      25/03/2025      sthanik-batmya    Share


डोंबिवली :

गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची निर्मिती करणाऱ्या डोंबिवली शहराने गेली २७वर्षे ही 

गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेची परंपरा जपली आहे. जुन्या डोंबिवलीकरांची ही परंपरा तंतोतंत पुढील पिढीने अबाधित राखली असून त्याच नियमात व शिस्तीत यात्रा श्री गणेश मंदिर संस्थान तर्फे होणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त मंडळ आणि प्रमुख यात्रा संयोजक अमेय काटदरे यांनी स्वागतयात्रेची संपूर्ण नियोजन केले असून नेहेमीप्रमाणे गुढीपाडव्याला बाप्पाच्या पालखीसह भव्य यात्रा होईल अशी माहिती दिली.

पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार यावर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंब या समृध्द व संस्कृती जीवनाच्या पंचसुत्रीवरील चित्ररथ असणार आहेत. त्याचप्रमाणे यानिमित्ताने धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी वृंदावनचे प्रभूदेशदास धर्मप्रसारक महंद आचार्य प्रणय महाराज  विशेष पाहुणे म्हणून येणार आहेत.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना श्री गणेश मंदिर संस्थांनच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त प्रवीण दुधे, गौरी खुंटे, श्रीपाद कुळकर्णी, मंदार हळबे, जयकृष्ण सप्तर्षी, आनंद धोत्रे, राजय कानिटकर, दीपक काळे, स्वागत यात्रा प्रमुख संयोजक अमेय काटदरे आदी उपस्थित होते. 

यावर्षी गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेत विविध

प्रकारचे ४० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरण

क्षेत्रातील सुमारे ८० संस्था सहभागी होणार

आहेत. यावर्षी चौदा ढोल पथकांना चौकांमध्ये

ढोल वादनास परवानगी देण्यात आली आहे. संस्कार भारती तर्फे महारांगोळी काढण्यात येणार आहे. 

सोमवारी राष्ट्रभक्तीपर गीतांचा देवदेशोपसनेचा कार्यक्रमात दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वागत यात्रेचे औचित्य साधून जून महिन्यापासून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश मंदिरात दर महिन्याच्या पहिल्या रविवारी

सकाळच्या वेळेत सामुदायिक वाढदिवस

अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात

येणार आहे. शहरातील १६ शाळांमधील

आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना गणेश मंदिर

संस्थानतर्फे २५ ते २७ मार्च या कालावधीत

पूर्वेकडील पूजा सिनेमागृहात संभाजी

महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.

२८ मार्च रोजी गणेश मंदिर येथे संध्याकाळी सात

वाजता भक्तिगीत व कीर्तनाचा कार्यक्रम होणार

आहे. २९ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता महिला,

पुरूष, तरूणांसाठी खुली असलेली स्कुटर फेरी

शहरातील १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर

काढण्यात येणार आहे. याच दिवशी संध्याकाळी

संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भागशाळा

मैदान येथे साहसी खेळ, मानवी मनोरे, ढोल,

लेझीम पथकांची प्रात्यक्षिके संध्याकाळी साडे

पाच वाजता होणार आहेत. रविवारी सकाळी पाच वाजता आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते गणेश मंदिरात महापूजा होईल. सात वाजता भागशाळा मैदान येथून प्रचलित मार्गावरून स्वागत यात्रेला सुरुवात होणार आहे. ३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान राम नाम जपयज्ञ होणार आहे.

+