team jeevandeep 24/04/2025 sthanik-batmya Share
कल्याण-
विवाह जुळणे हि आज भीषण समस्या निर्माण झाली असून एकाच छताखाली स्थळे मिळून वेळ आणि मोठ्या संख्येने पैसा वाचावा ह्या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे रविवार २७ एप्रिल रोजी कल्याण येथे आयोजन करण्यात आले आहे.
कल्याणातील महापालिकेसमोरील शंकरराव चौक येथील स्वामी नारायण हॉल येथे सकाळी १० ते २ ह्या वेळेत बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड हे बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जाधव उपस्थित राहणार आहेत. ॲड. रोहन गायकवाड उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री ॲड. प्रकाश जगताप, रविंद्र गुरचळ , केतन रोकडे , मिलिंद गायकवाड, समाधान मोरे, अरुण भालेराव, रमेश बर्वे , मनोज जाधव, रमेश जाधव, सचिन भालेराव, अनिल इंगळे, भूषण कोकणे, वैशाली वाघ, नेहा रामराजे, कांचन केदारे, योगिता पवार, छाया वाघमारे, उर्मिला भालेराव, कल्पना खरात, कमल भडांगे , अनिता शिंदे, सुवर्णा गायकवाड, सिंधू मेश्राम, भारती जाधव, गणिता आठवले, सुषमा गायकवाड, सुषमा अहिरे, दिपा गांगुर्डे इत्यादी मान्यवर तर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. संजीव कांबळे, श्रद्धा केदार, रूपाली वानखेडे, सुप्रसिद्ध पत्रकार सिद्धार्थ गायकवाड, सिद्धार्थ वाघमारे , राजू काऊतकर, सुप्रसिद्ध कर्मचारी नेते शशीकांत पवार उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी अनिल काकडे 9324552963, 8104211818 ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे