team jeevandeep 21/04/2025 sthanik-batmya Share
पेण (प्रतिनिधी)
शासकीय अध्यापक विद्यालय पनवेल येथील सन १९८३ते ८५ या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल चाळीस वर्षांनी एकत्र भेटले. या सर्व विद्यार्थ्यांचे स्नेह-संमेलन आगरी मंच पेण येथे मोठ्या थाटामाटात नुकतेच संपन्न झाले.
सुरवातीला ईशस्तवन स्वागतपद्य गायन करून उपस्थितांचे हस्ते गणेश पुजन झाले. सुधीर मांडवकर आणि सौ. कुंदा म्हात्रे यांनी वैज्ञानिक पध्दतीने बिन वातीचा व बिन तेलाचा दिवा पाणी ओतून प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अशोक पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चंद्रकांत म्हात्रे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचे महत्व विषद केले. सर्वांनी "40" वर्षानंतर भेटल्या बद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी ४० वर्षातील गमती जमती व सेवा करताना आलेले चांगले वाईट अनुभव विशद करून मनोरंजन पद्धतीने आनंद व्यक्त केला.प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग म्हात्रे होते.अध्यक्षस्थान भिकाजी तांबोळी यांनी भूषवले,तर सुरेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत म्हात्रे, अशोक पाटील,कल्पना म्हात्रे, प्रदीप म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली,सुधीर मांडवकर यांनी कार्यक्रमाचे सुरेख चित्रीकरण केले.
अशोक पाटीलसरांनी पसायदान गायन करून कार्यक्रमाची सांगता केली.