Visitors: 391079
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

ठाण्यातील कचऱ्याला स्थानीकांचा विरोध, ७ एप्रिलला डम्पिंग विरोधी स्थानिक संघर्ष समितीचे आंदोलन.

  team jeevandeep      04/04/2025      sthanik-batmya    Share


पडघा दि. ४

(बातमीदार) ठाणे महापालिकेने भिवंडी तालुक्यातील आतकोली येथील जागेत बेकायदेशीर शास्त्रोक्त क्षेपणभुमी(डंपीग ग्राउंड) प्रकल्प आणल्याने परीसरातील नागरीकांना त्रास होऊन आजुबाजुच्या विकासावरसुध्दा गंभीर परीणाम होणार असल्याने ठाण्यातील कचऱ्याला विरोध करुन ७ एप्रिलला डम्पिंग विरोधी स्थानिक संघर्ष समिती आंदोलन करणार आहे.

                 ठाण्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेने आतकोली येथील ८६ एकर जागा बेकायदेशीरपणे संपादित केली असुन त्या ठिकाणी शास्त्रोक्त क्षेपणभुमीचा (डम्पिंग ग्राऊंड) प्रकल्प आणल्याने ठाणे शहरातील दररोज एक हजार टन कचरा आतकोली येथील प्रकल्प जागेवर मोठ मोठ्या डंपर मार्फत आणण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे आतकोली व परिरीसरात दुर्गंधी पसरली असुन वातावरणातील हवा दुषीत होऊन आतकोली, भादाणे, जुपाडा, शेरेकरपाडा, चिराडपाडा, पिसे, किरवली, आमणे, आमणेपाडा, वाशेरे, सापे, तळवली, अर्जुनली, पडघा, कुंरूद, दळेपाडा, वाफाळे, आन्हे, वांद्रे, सोर, गावातील सुमार १ लाख नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच दुर्गंधीमुळे परिसरात असलेल्या शेती विवीध विकासकामांवर परिसरात आलेले गोदाम, उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम होणार असुन कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात आलेले उद्योगधंदे बाहेर गेल्यास बेरोजगारी वाढणार आहे. सदर बाबतील शासनास प्रशासनास तक्रार, निवेदन देऊनही काहीच कारवाई होत नसल्याने अखेर ठाणे महापालिकेच्या शास्त्रोक्त क्षेपणभुमी (डम्पिंग ग्राऊंड) प्रकल्पाविरोधात डम्पिंग विरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समितीच्या वतीने ७ एप्रिल रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समीतीचे रमेश शेलार, प्रकाश भोईर अँड. संदीप जाधव, भास्कर माळी, सरपंच रविंद्र विशे, शैलेश बिडवी, दिनेश गंधे, रघुनाथ पाटील, बारकु राउत, यांनी पडघा ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली व सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, नागरीकांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच या शास्त्रोक्त क्षेपणभुमी (डम्पिंग ग्राऊंड) प्रकल्प विरोधात हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असुन यांची दखल न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी समीतीच्या वतीने देण्यात आला.

+