Visitors: 391431
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

ठाण्यात ‘एक गाव, एक होळी’उत्साहात साजरी; पारंपारिक वेशभुषेत कोळीबांधवांचा सहभाग

  team jeevandeep      13/03/2025      sthanik-batmya    Share


शहरातील चेंदणी कोळीवाडा येथे होळीच्या पूर्वसंध्येला साजरी होणारी ‘एक गाव एक होळी’ ही चळवळ गावकीच्या एकजुटीची प्रतीक मानली जाते.

ठाणे -शहरातील चेंदणी कोळीवाडा येथे होळीच्या पूर्वसंध्येला साजरी होणारी ‘एक गाव एक होळी’ ही चळवळ गावकीच्या एकजुटीची प्रतीक मानली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने होळीच्या पूर्वसंध्येला ‘एक गाव एक होळी’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व आगरी कोळी बांधव, महिला पारंपारिक वस्त्रे परिधान करुन एकत्र येत मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. यावेळी कोळीगीते आणि कोळी बॅण्डवर सर्व कोळी बांधव ताल धरला.

फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण उत्साह आणि जल्लोषाची पर्वणी असते. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात ‘शिमगा’ म्हणजेच ‘होळी’ हा सण साजरा करण्याची पारंपारिक प्रथा वर्षांनुवर्षांपासून चालत आली आहे. त्याचप्रमाणे, ठाण्यातील चेंदनी कोळीवाडा येथे ‘एक गाव एक होळी’ ही प्रथा अनेक वर्षापासून जोपासली जात आहे. ‘एक गाव एक होळी’ ही पद्धत खरंतर फार पूर्वीपासूनची होती. परंतू, ८४ वर्षांपूर्वी हा उत्सव काही कारणास्तव बंद झाला होता. २०१५ साली कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकात नाखवा होते. त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन या उत्सवाला पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्यानुसार, यंदा या ‘एक गाव एक होळी’ चे हे ११ वे वर्षे असल्याची माहिती या गावातील डॉ. गिरीश साळगांवकर यांनी दिली.

+