Visitors: 228725
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली उल्हास नदीची पहाणी जल पर्णी बाबत ठोस उपाय योजना करण्याचे आश्वासन.

  team jeevandeep      02/04/2025      sthanik-batmya    Share


कल्याण :

ठाणे जिल्हा परिषदेचे डँशिग, कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांनी अंबरनाथ, कल्याण पाहणी दौऱ्यात उल्हासनदीतील जलपर्णीची पाहणी केली, यावेळी याची व्यापकता पाहता ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवावे ते प्रस्ताव शासनास पाठविण्यात येणार असल्याचे  श्री रोहन घुगे  यांनी सांगितले,

यासह त्यांनी मेमोरिडिंग साठी अंबरनाथ पंचायत समिती ला भेट दिली, व आढावा घेतला. नेवाळी ग्रामपंचायतीला भेट देऊन घनकचरा व्यवस्थापन बाबत चर्चा केली,  घरकुल योजनेतील घरांची पाहणी केली.

महाराष्ट्रातील नद्याने  प्रदूषण वाढत आहे. त्यात उल्हास नदी आघाडीवर आहे. या बाबत  उल्हास नदीचे  नदीपात्र जलपर्णीने भरले असल्याने मासे व इतर जलचर यांचे जीवन धोक्यात आले आहेत. याबाबत दैनिक ठाणे जीवनदीप व  पत्रकार संजय कांबळे यांनी इलेक्ट्रॉनिक्स मिडिया व विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती.

याची दखल ठाणे जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांनी घेतली, तात्काळ त्यांनी म्हारळ, वरप, कांबा येथे भेट देऊन उल्हास नदीतील जलपर्णीची पाहणी केली, यावेळी त्यांच्या समवेत अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र)प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत)

कल्याण चे तहसीलदार, सचिन शेजाळ, म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम निलिमा म्हात्रे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, विस्तार अधिकारी श्री भोसले, ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे, आदी मंडळी उपस्थित होते.

उल्हास नदीपात्रातील जलपर्णी पाहता हे काम किती व्यापक  व खर्चिक असल्याने ते ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.यामुळे याबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना ग्रामपंचायतीना देण्यात आल्या, भविष्यात उल्हास नदी शुध्दीकरणाबाबत येथील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.(

+