team jeevandeep 22/04/2025 sthanik-batmya Share
ठाणे :
एप्रिल संपत आला ठाणे जिल्हा परिषद शिक्षकांचे ही पगार नाहीत.
प्रत्येक महिन्याचे वेतन दहा तारखे पूर्वी करणारच असे आश्वासन देणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेचे मार्च महिन्याचे वेतन एप्रिल संपत आला तरी देखील झाले नाहीत.
ठाणे जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. नको त्या कमांच्या नावाने उधळ पट्टी सुरु आहे. मात्र पगार देण्यास निधी नाही म्हणून शिक्षकांचे पगार रखडून ठेवले आहेत.
ग्रॅच्युटी, पेन्शन च्या रकमा दोन वर्ष उलटून दिल्या गेल्या नाहीत, प्राथमिक शिक्षण अधिकारी सांगतात पैसे नाहीत. तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात कोणाचे पैसे बाकी नाहीत. विभाग आढाव्या माहिती घेत असतो असे सी ओ साहेब म्हणतात. मग निवृत्त शिक्षकांची हेळसांड का.? असा प्रश्न या निवृत्त शिक्षकांचा आहे.
ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आर्थिक निधी का मिळत नाही? प्रशासन कमी पडते आहे? बिचारे सेवा निवृत्त व कार्यरत शिक्षक त्यामुळे हवालदिल झाले आहेत.