Visitors: 390946
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यानीं घेतली अजितदादांची सदिच्छा भेट

  team jeevandeep      22/04/2025      sthanik-batmya    Share


पडघा दि. २२ (प्रतिनिधी )

ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यानीं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यचेउ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन विविध विषयासंदर्भात चर्चा केली. 

                  मंत्रालय मुंबई समोरील राष्ट्रवादी भवनात सोमवारी ही भेट घेण्यात आली यावेळी ग्रामीणमधील सार्वजनिक आरोग्य, रस्ते, पाणी, व राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणीबाबत चर्चा करण्यात आली यावेळी गरजुंना मदत करण्यासाठी नेहमी पुढे येत जा व राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी जोमाने करा घाबरू नका मी कायम तुमच्या सोबत आहे.असे अजितदादा पवार यांनी यावेळी ठाणे ग्रामीण मधील पदाधिकांऱ्याना मार्गदर्शन करताना सांगितले.तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी भिवंडी तालुका अध्यक्ष दिलशाद शेख यांच्या वतीने अजितदादा पवार यांना फोटोफ्रेम भेट देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत भाऊ गोंधळे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा कल्पना तारमळे, राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष प्रतीक हिंदुराव भिवंडी तालुका अध्यक्ष विजय दादा पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी भिवंडी तालुका अध्यक्ष दिलशाद शेख शहापूर शहर युवा कार्यकर्ते केतन वेखंडे उपस्थित होते.

+