team jeevandeep 17/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे रामबाग शाखेचे कार्यालय प्रमुख संदेश वाघदरे शिवसैनिक हमिद शेख यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या निमित्ताने कल्याणात उध्दव ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी संदेश वाघदरे यांची कल्याण -मुरूबाड जिल्हा प्रमुख यांच्या कार्यालयाचा कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली. यावेळी केडीएमसीचे माजी परिवहन सभापती मनोज चौधरी देखील उपस्थित होते.