team jeevandeep 25/03/2025 sthanik-batmya Share
दिनांक २५.०३.२०२५ रोजी भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका अंतर्गत क्षयरोग विभाग मध्ये प्रधान मंत्री टीबी मुक्त अभियान योजने अंतर्गत श्री. मो. असद कासमी यांच्या तर्फे 10 गरजू क्षयरुग्ण यांना ६ महिन्याकरिता दत्तक घेऊन आज फूड बास्केट कीट वाटप करण्यात आले. या क्षणी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बुशरा सय्यद, आरोग्य विभागचे IFM श्री. मो. असद कासमी व प्रवीण जाधव तसेच क्षयरोग विभागाचे जिल्हा समन्वयक श्री. अनिल गुप्ता व कर्मचारी उपस्थित होते.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील क्षयरोग निर्मुलन करणेकरीता रुग्णांना औषधोपचार, इतर मदत तसेच जनजागूती करणे आवश्यक आहे. यांचा सहभाग वाढविणेकामी भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या मा. प्रशासक तथा आयुक्त सो. श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.) यांनी , वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांनी शहरातील सर्व नागरीक, लोकप्रतिनिधी, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, कॉरपोरेट संस्था, शासकीय व निमशासकीय अधिकारी/कर्मचारी इ. यांना निक्षय मित्र बनण्याकरिता जाहीर आवाहन करीत आहेत, शहरामधील क्षयरुग्णांचे मदतीसाठी स्वतः पुढे येऊन आवश्यक ती मदत करावी. सद्या भिवंडी मनपा शहरामध्ये अंदाजे ४११४ रुग्ण आहेत. सहा महीन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या निक्षय पोर्टलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. याकरीता शासनाच्या निक्षय प्रणालीवर संबंधीतांचे नांव नोंदविले जाते. अधिक माहिती करिता शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बुशरा सय्यद मो.नं. ८८५०४८५८४८ आणि श्री अनिल गुप्ता, जिल्हा समन्वयक, मो.नं. ७०२१५०७४२७ यांना संपर्क करावा.