Visitors: 239214
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

टिटवाळ्यात विद्युत शॉक लागून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

  team jeevandeep      20/12/2024      sthanik-batmya    Share


कल्याण : टिटवाळा मांडा परिसरात पाणीपुरवठा वाहिन्याचे लिकेज काढण्याचे काम सुरू असताना शॉक  लागून एका कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.   

    मांडा टिटवाळा परिसरातील रविंद्र अँर्केड परिसरात जल वाहिन्यांचे लिकेज काढण्याचे काम सुरू होते. पाणी काढण्यासाठी सबमर्शिबल पंप लावला होता. याठिकाणी  ठेकेदाराचा कंत्राटी कामगार अरूण कांबळे हा काम करीत असताना पाण्यामध्ये विघुत प्रवाह उतरल्याने  अरूण यांस विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अरूण यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आला असल्याची माहिती अधिकारी सूत्रांकडून मिळाली.

 मोहने परिसरात अरूण कांबळे यांच्या शॉक लागून मृत्यू झाल्याची वार्ता मिळताच परिसरात एकच हळ हळ व्यक्त होत होती. अरूणच्या पश्चात दोन लहान मुले, पत्नी यांच्यावर दुखाचा  डोंगर कोसळला आहे.

 

+