team jeevandeep 06/02/2025 sthanik-batmya Share
कल्याण : आपलं शरीर निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी आपण नेहमीच पोषक अन्नग्रहण करत असतो. परंतु मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणूनच आजच्या तरुण पिढीला मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी योगा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावं हा हेतू समोर ठेवून जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत लक्ष लक्ष सूर्यनमस्कार या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळेस योग शिक्षिका सायली जाधव आणि त्यांचे सहकारी यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमांमध्ये शकुंतला विद्यालय, सेंट थॉमस रोकडे विद्यालय, निर्मल इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय गोवेली जीवनदीप वरिष्ठ महाविद्यालय गोवेली जीवनदीप विधी महाविद्यालय गोवेली अशा वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयातील जवळपास सहाशे ते साडेसहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळेस मुलांना सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावून त्यांकडून प्रात्यक्षिक रित्या सूर्यनमस्कार करून घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश लकडे व आभार प्रदर्शन प्रा. धनगर यांनी केले. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडवींदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के.बी कोरे, संचालक प्रशांत घोडविंदे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे, मुख्याध्यापिका भावना कुंभार तसेच इतर सर्व प्राध्यापक त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. दिनेश धनगर, क्रिडा विभागाचे प्रमुख प्रा.मोहनीश देशमुख, गगन सपकाळ, निकिता, चव्हाण, प्रवीण भालेराव आणि सर्व शिक्षक स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.