team jeevandeep 19/04/2025 sthanik-batmya Share
जीवनदीप महाविद्यालय खर्डीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय लॅक्रोस स्पर्धेत पुणे येथे उल्लेखनीय कामगिरी दिनांक 14 व 15 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय लॅक्रोज या नव्या क्रीडा प्रकारात जीवनदीप महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा खुला गटात चतुर्थ क्रमांक पटकावला तसेच तसेच 19 वयोगटाखालील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावल. काही विद्यार्थी हे पुढील राज्य पातळीवर खेळण्यासाठी देखील निवड झाली. सदर खेळात 19 वयोगटा खालील गटात जीवनदीप महाविद्यालयाचे विद्यार्थी सनी गावित, आयुष्य खंडे, प्रसाद जाधव याची महाराष्ट्र संघासाठी साठी निवड झाली आहे. या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली असून श्री रविंद्र घोडविंदे ( अध्यक्ष, जीवनदीप शैक्षणिक संस्था) प्रा कैलास कळकटे ( प्र.प्राचार्य) प्रा सोनाली शेलार ( क्रिडा प्रशिक्षक) सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे