team jeevandeep 29/03/2025 sthanik-batmya Share
राज्य खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई व जीवनदीप महाविद्यालय खर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २९/०३/२०२५ रोजी महाविद्यालय स्तरावर हिंदी निबंध लेखन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धा करिता खादी संदर्भातील विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या निबंध लेखन स्पर्धेचे विजेते अनुक्रमे प्रथम कु.स्नेहा पाटील(११ वी विज्ञान), द्वितीय कु. सदफ खलील दळवी (बी.ए प्रथम वर्ष),तृतीय कु.समीक्षा देशमुख (११ वी वाणिज्य)तर उत्तेजनार्थ कु. शिफा शेख (बी.ए प्रथम वर्ष), कु. यश केदारे(११ वी कला), कु.पायल इदे हे आहेत.
तद्नंतर या निबंध स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ सहसंचालक श्री. उदय बऱ्हाटे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी त्यांनी खादी व ग्रामोद्योग क्षेत्रातील रोजगारा संबधी विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संदेश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. दिप्ती मोरे-चव्हाण यांनी केले.
सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.