team jeevandeep 17/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी झाली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शिक्षण पद्धतीमध्ये झालेला बदल त्याचा भविष्यात होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी जीवनदीप शैक्षणिक संस्थापोई संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे नुकतेच सादूबेला कॉलेज उल्हासनगरचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठातील सिनेट मेंबर , शिक्षणतज्ञ ,डॉ. वसंत माळी यांच मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केलं होत. यावेळेस अनेक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीलाच जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यात ते म्हणाले बदल हा अपरिहार्य असतो. आताच्या पिढीशी प्रगलबता अधिक आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातला बदल गरजेचा आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. वसंत माळी यांनी या नवीन लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सविस्तर माहिती सांगितली त्याचबरोबर या धोरणाचे भविष्यात होणारे फायदे सांगितले. तसेच या नवीन लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट स्पष्ट करून उत्तमरीत्या मार्गदर्शन केले.
या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.सतीश लकडे यांनी केले. कार्यक्रमास गणेश विद्यालय टिटवाळा च्या रोहिणी भाटे, भारतीय सैनिक विद्यालय खडवलीचे संदीप भोये, शकुंतला विद्यालय अनखरपाडाच्या छाया बोरसे, माधवराव रोकडे विद्यालयाच्या वृषाली कदम, मराळेश्वर विद्यालय म्हारळचे शिवाजी चौधरी, जागृती विद्यालय दहागाव चे श्यामकुमार मिरकुटे, रायते विभाग हायस्कूलचे देविदास सूर्यवंशी, सरस्वती हायस्कूल घोडसईचे आत्माराम राऊत, अब्दुल कादिर जुवारी उर्दू हायस्कूलचे सीमाब कुंगळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.