team jeevandeep 04/03/2025 sthanik-batmya Share
खर्डी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "जागतिकिकरणाचा भारतीय समाजावरील परिणाम " याविषयावर 'एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि.04 मार्च 2025 रोजी करण्यात आले .
या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाट्न मुंबई विद्यापीठाच्या मानव्य आणि सामाजिक शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल सिंग यांच्या हस्ते झाले.यावेळी चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. सतीश बडवे, जी. शै. सं चे अध्यक्ष श्री. रवींद्र घोडविंदे उपस्थित होते.चर्चासत्रात मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद कुमरे,डॉ. वासुदेव वले, डॉ. विलास गायकर, डॉ. ताहेर पठाण तसेच या चर्चासत्रात जी. शै. सं चे संचालक श्री प्रशांत घोडविंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास कळकटे उपस्थित होते.
'बदल हे जागतिकिकरणाचे सूत्र आहे तसेच जागतिकिकरणामुळे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात झालेल्या बदलाचा चांगला व वाईट परिणाम .' याविषयी मत बिजभाषक डॉ. सतीश बडवे यांनी व्यक्त केले. मुंबई विदयापीठचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी, "जागतिकिकरणामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पडलेला सकारात्मक व नकारात्मक बदलाची चर्चा ' केली.डॉ. वासुदेव वले यांनी,"इतर भाषा जगातून घेण्यापेक्षा मराठी भाषा जगाला देणे " हा विचार मांडला.डॉ. विलास गायकर यांनी, "जागतिककरणामुळे आर्थिक, सामाजिक, पर्यटन क्षेत्रात झालेले परिणाम व बदलांची चर्चा केली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.या जागतिकिकरणाच्या प्रभावाने ज्या ज्या क्षेत्रात परिणाम झालेत त्यावर काही मार्ग कसा काढता येईल यावर चर्चा झाली.
या चर्चासत्रासाठी जवळपास ५७ अभ्यासकांनी वेगवेगळ्या विषयांवर शोधनिबंध लिहिले असून महाविद्यालयाच्या माध्यमातून या शोधनिबंधाचे प्रकाशन देखील करण्यात आले. या चर्चासत्राचे समन्वयक म्हणून डॉ विनोद होले , सहसमन्वयक म्हणून प्रा रसिका सपकाळ यांनी जबाबदारी पार पाडली. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रा विशाल भोसले, प्रा दिप्ती मोरे, प्रा प्रियंका पवार, प्रा शरद खाकर, प्रा सोनम मोरे, प्रा भुषण विशे यांनी मोलाची कामगिरी बजावली.