Visitors: 228990
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहपुर्ण संपन्न

  team jeevandeep      20/03/2025      sthanik-batmya    Share


दि. २० (जिल्हा परिषद, ठाणे)- जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा डोंबिवली, जिमखाना येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. मंगळवारी, दिनांक १८ मार्च, २०२५ रोजी जलतरण स्पर्धा व बुधवारी, दिनांक १९ मार्च, २०२५ रोजी मैदानी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

          याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा राधिका गुप्ते यांनी सर्व पालक, शिक्षक वर्ग यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचा शाळेत सराव घेऊन त्यांना मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तयार केले, त्याकरिता त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. 

         जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धेंत प्रथम क्रमांकाने पहिल्या येणाऱ्या खेळांडूची निवड राज्यस्तरिय क्रीडा स्पर्धेकरिता करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळासाठी तयारी करण्याबाबत समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी शुभेच्छा दिल्या. 

         याप्रसंगी समाज कल्याण विभागातील सहाय्यक सल्लागार संगिता शिर्के, ७०० विद्यार्थी, १७५  सहभागी कर्मचारी वर्ग, ११५ पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          प्रास्ताविक करताना रत्नाकार सोनावणे यांनी दिव्यांग बालकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. खेळ मुलांसाठी महत्त्वाचे असून आनंद आणि तणाव विरहित मुले जास्त कार्यक्षम होण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असतात, असे प्रतिपादन केले. 

          अंध प्रवर्गातील क्रीडा स्पर्धा या अंतर्गत ८ ते १२ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पासिंग द बॉल,  २५ मीटर धावणे, १२ ते १६ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर धावणे, बुद्धिबळ, उभे राहून लांब उडी मारणे, १६ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी १०० मीटर धावणे, बुद्धिबळ, उभे राहून लांब उडी मारणे, तर बहु विकलांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तोल सांभाळून डोक्यावर वस्तू घेऊन चालणे, अपूर्ण चित्र पूर्ण करणे, ५० मीटर धावणे या स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडल्या. कर्णबधिर प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोळा फेक, लांब उडी, ५० मीटर धावणे, पोहणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर धावणे जागेवरून लांब उडी, गोळा फेक अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.‌ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर सोनावणे, नितीन हरड यांनी उत्तमरीत्या केले आहे.

+