Visitors: 391057
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे भाजप सरकार विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन!

  team jeevandeep      17/04/2025      sthanik-batmya    Share


 मुरबाड दि.१७-

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मोदी शासनाने द्वेषपूर्ण व सुडबुद्धीच्या भावनेने कारवाई करण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीला घातक आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाने लढा  सुरू केला असून आज जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे ठाणे शहर जिल्हा व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी आयोजित केलेल्या या आंदोलनाला राष्ट्रीय सचिव तथा कोकण प्रभारी  वेंकटेश यांच्यासह ठाणे शहर, ठाणे ग्रामीण जिल्हा, कल्याण शहर जिल्हा, भिवंडी शहर जिल्हा व उल्हासनगर शहर जिल्हा मधील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

+