team jeevandeep 23/04/2025 sthanik-batmya Share
दि. २३(जिल्हा परिषद, ठाणे) –
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत मुरबाड पंचायत समिती येथे दि. २२ एप्रिल, २०२५ रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला आणि संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
या बैठकीत घुगे यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रशासकीय कामकाज बाबत कर्मचारी यांनी कार्यवीवरण पत्र, कामकाज संदर्भात सुरू असलेल्या फाईल (Standing office file), ई ऑफिस कार्यप्रणाली सुरळीतपणे पार पाडणे अत्यावश्यक आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष केंद्रित करावे. कार्यालयीन सूचनांचे पूर्ण पालन करणे, योजनांची अंमलबजावणी तातडीने करणे आणि १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे यावर त्यांनी भर दिला.
तसेच १०० दिवसीय आराखड्यातील सर्व कामे ३ दिवसांत पूर्ण करण्यात यावेत. पी.एम.जन. मन व रमाई योजनेची घरकुलांना ७ दिवसांच्या आत मंजुरी देण्यात यावी. अभिलेख वर्गीकरणाचे नाशनाचे काम २ दिवसांत पूर्ण करण्यात यावेत. स्वच्छ भारत मिशन योजनेचे फोटो ३ दिवसांत अपलोड करण्याच्या सुचना दिल्या. त्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये तालुक्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम करावे, आवश्यक तेथे जबाबदाऱ्या स्पष्ट करून कार्यवाही करावी, असे स्पष्टपणे नमूद केले.
बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे तसेच गट विकास अधिकारी (मुरबाड) लता गायकवाड, सर्व तालुका विभाग प्रमुख, पंचायत समिती मुरबाड तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते.