Visitors: 391583
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

जागतिक महिला दिनानिमित्त शिल्पा तांगडकर जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित

  team jeevandeep      10/03/2025      sthanik-batmya    Share


जागतिक महिला दिनानिमित्त शिल्पा तांगडकर जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित

कल्याण मध्ये स्फूर्ती फाउंडेशनच्या कार्याचा गौरव

रोटरी क्लब ऑफ डायमंडस वतीने महिला सन्मान सोहळा

कल्याण : जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील राजस्थान भवन,पारनाका येथे रोटरी क्लब ऑफ डायमंडच्या वतीने महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिलांना जिवन गौरव व जिवन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये स्फूर्ती फाउंडेशनच्या शिल्पा तांगडकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गवर्नर दिनेश मेहता,ज्योती मेहता, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडस अध्यक्ष अरविंद शिंदे, सेक्रेटरी राजेश चासकर, प्रकल्प प्रमुख संगिता शिंदे, सहप्रकल्प प्रमुख पल्लवी चौधरी उपस्थित होते.

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक कर भरत असतो परंतु त्यांना रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, कचरा, पाणी या विविध नागरी समस्या भेडसावत असतात त्या  सोडविण्यासाठी  स्फूर्ती फाउंडेशन विविध विभागांना सातत्याने पत्रव्यवहार करत पाठपुरावा करत प्रश्न सोडविण्यासाठी  प्रयत्न करीत आहे.  शासकीय योजना नागरीकांपर्यंत पोहचल्या पाहिजे त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे.  कल्याण मध्ये १०० अधिक विधवा व गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, ब्युटी पार्लर, शिलाई मशीन, संगणक प्रशिक्षण, मेहंदी, इंग्लिश स्पिकींग अशी व्यवसाय व नोकरी प्रशिक्षण महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी देत आहे.

 तसेच विविध शासकीय कागदपत्रे आधारकार्ड, मतदानकार्ड, उत्पन्नाचे दाखले, रेशनकार्ड यासाठी शिबीर राबवित आहे. विविध सामाजिक उपक्रम नागरिकांच्या हितासाठी राबवत आहे.  या कार्याची दखल घेत आज जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडस वतीने शिल्पा तांगडकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

+