team jeevandeep 28/02/2025 sthanik-batmya Share
मुरबाड :
२००६ ते २०२५ या कालावधीत शासनाने चार योजना राबवुन राज्यातील पाणी टंचाई दुर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या योजना फक्त कागदावरच राहून महाराष्ट्र मात्र तहानलेलाच राहिला. या मध्ये प्रामुख्याने
1)जल स्वराज्य
2)जल युक्त शिवार
3)भारत निर्माण.
4)जल जिवन मिशन या पाणी पुरवठ्याच्या चार योजनेतून शासनाने महाराष्ट्र हंडा मुक्त करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले गेले. सोळा वर्षाच्या कालावधीत चार योजना झाल्या. तरीही महाराष्ट्र हंडा मुक्त किंवा टॅकंर मुक्त झाला नाही. जनतेचा पैसा अक्षरशा ठेकेदार आणि अधिकारी यांनी खोऱ्याने ओढला. महाराष्ट्रातील समस्त महिलांची फसवणूक करून सर्व योजनांचे वाटोळे लावले.आजही ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके तहानलेलेच आहेत. पालघर जिल्ह्यातही तिच अवस्था. म्हणुनच जनतेच्या पैशाचा हिसाब मागण्यासाठी दिनांक -०३/०३/२०२५ पासून माहिती अधिकार फेडरेशन महासंघाचे अध्यक्ष सुभाषजी बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष शंकरजी वडवले हे जिल्हा परिषद ठाणे येथे आमरण उपोषणास बसणार असुन सदर उपोषणास ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक पडवळ यांच्यासह ठाणे पालघर ,मुंबई ,कोकण विभागातील तालुका अध्यक्ष, सर्व पुरूष व महिला कार्यकर्ते शंकरजी वडवले यांचे मनोबल वाढविण्यासाठी व भ्रष्टाचारी प्रशासनास जाग आणण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहुन माहीती अधिकार महासंघाचा दणका दाखवुन देणार असल्याचे शहापूर महिला तालुका अध्यक्षा सौ.माया मगर यांनी सांगितले.