team jeevandeep 21/03/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.२१-
केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांना सरसकट घरकुल मंजूर केले, मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत किसळ- पारगाव मधील ९१ कुटुंब या यादीत समाविष्ट होते परंतु ५४ कुटुंबांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला, वंचित राहिलेल्या कुटुंबांना व मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन व या योजनेची माहिती योग्य रीतीने पोहोचविण्यासाठी सरपंच डॉ कविता वरे यांनी पुढाकार घेऊन १९ मार्च २०२५ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले, यादीत समाविष्ट सर्व कुटुंब उपस्थित होते तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घरकुल विभागाचे अभियंता आवर्जून उपस्थित होते. सरपंच व अभियंता यांनी पात्र लाभार्थी व वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले ज्या द्वारे त्यांचे योग्य समाधान झाले. या सभेला ग्रामसेवक ललिता पवार, सदस्या वैष्णवी पडवळ, मोहन पडवळ व सुनिल पडवळ उपस्थित होते.