Visitors: 227623
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

ग्राहकांना हक्काच्या सेवा पुरवाव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा !

  team jeevandeep      19/04/2025      sthanik-batmya    Share


वासिंद (प्रतिनिधी )-

ग्राहकांना हक्काच्या सेवा पुरवाव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा  इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील बँक ऑफ बडोदा या बँक शाखा व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

     येथील असलेल्या ऑफ बडोदा या बँक शाखेत वारंवार विविध तक्रारी ग्राहकांकडून येत असून ग्राहकांना त्यांना अभिप्रेत असलेल्या ग्राहकांच्या हक्काच्या अनेक सेवा सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात मनसेचे वासिंद शहर अध्यक्ष अमोल बोराडे,  शहर उपाध्यक्ष कुणाल पांडव, अल्पेश  खिस्मतराव, वैभव बिडवी या कार्यकर्त्यांनी बँक व्यवस्थापन यांना निवेदन देऊन या याबाबत इशारा दिला आहे. 

    सदर बँकेतील बँकेचे पासबुक प्रिंटिंगचे मशीन अनेक दिवस बंद, एटीएम मशीन देखील वारंवार नादुरुस्त किंवा बंद यामुळे ग्राहकांना या सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या ग्राहकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहकांची नाराजी आहे. तसेच कर्मचारी येणाऱ्या ग्राहकाशी अत्यंत उद्धट व उर्मटपणाची वागणूकीत बोलत असल्याने ग्राहकांमध्ये वाद-विवाद निर्माण होत आहेत त्यामुळे ग्राहकांशी सौम्य वर्तन करण्याची समज देण्यात यावी तर शाखेत बॅंकीय व्यवहार व मराठी भाषेचा परिपूर्ण वापर झाला पाहिजे जेणेकरून ग्राहकांना इतर भाषेचा त्रास होणार नाही अशी सक्त ताकीद देत असल्याचे म्हटले आहे. 

    दरम्यान, याबाबत दखल घेऊन ग्राहकांना त्यांचा अधिकार व सुविधा ताबडतोब उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

+