Visitors: 229961
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

गोळीबार प्रकरणात वैभव गायकवाड यांना क्लीनचिट ?

  team jeevandeep      25/02/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण पूर्वेचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणाच्या पुरवणी चार्जशीटमधून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याचं नाव पोलिसांकडून वगळण्यात आलं आहे. वैभव याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

जवळपास वर्षभरापूर्वी गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिंदेसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत गायकवाड हे अजूनही जेलमध्ये आहेत. त्यांच्यासह अन्य काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात आरोपी म्हणून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याचंही नाव सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलं होते. मात्र या प्रकरणाची पुरवणी चार्जशीट नुकतीच उल्हासनगरच्या न्यायालयात सादर करण्यात आली असून त्यातून वैभव गायकवाड याचे नाव वगळण्यात आल्याचे समोर आलं आहे.

याबाबत पोलिसांना विचारले असता, वैभव गायकवाड यांचा या गोळीबारात सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत. इतकेच नव्हे, तर गोळीबार होण्यापूर्वीच ते पोलीस ठाण्याच्या ही बाहेर पडले होते हे सीसीटीव्हीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे चार्जशीटमधून त्यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यापासून वैभव गायकवाड फरार असून आता मात्र चार्जशीटमध्ये त्याचं नावच नसल्यामुळे पोलिसांनी त्याला एकप्रकारे क्लीनचीट दिल्याची चर्चा आहे.

+