Visitors: 390295
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

गुलाबी कातकरी वाडी येथे समाजोपयोगी उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना सायकली वाटप !

  team jeevandeep      03/05/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड दि.३-

मुरबाड तालुक्यातील  विविध  नावीन्यपूर्ण  उपक्रम  राबविण्यात  यशस्वी  झालेल्या गुलाबी  कातकरी  वाडीत महावीर  इंटरनॅशनल  पवई  यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात २० विद्यार्थ्यांसाठी सायकली वाटप करण्यात आल्या तसेच  वाडीतील सर्व महिलांना दर्जेदार  चप्पला,ताटे, तसेच शाळकरी  मुलांना टि शर्ट, दफ्तर खाऊ  या  वस्तू  भेट  देण्यात  आल्या.  यावेळी संस्थेचे  संस्थापक  रणजित  सिंग  कुमट, अध्यक्ष अमित  जैन,उपाध्यक्ष राजू शर्मा, सचिव विनोद  कुमट, खजिनदार  सुनील  चौधरी, सदस्य  अजित  जैन,मोनिका  जैन, इशाका  जैन, सरिता  जैन  यांनी  मेहनत  घेतली.शांताई निसर्ग  पर्यटन  केंद्र   शेलारी म्हाडस येथे  कार्यक्रम आयोजित करण्यात  आला  होता.  श्री  गणेश  मित्र मंडळ व गुलाबी  वाडी  यांचे सहकार्य  लाभले.

+