Visitors: 237703
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

  team jeevandeep      30/12/2024      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कल्याण पश्चिमेतील अचिव्हर्स महाविदयालयात मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन  मुंबई विद्यापीठाचे माजी  कुलगुरु तथा  बिर्ला महाविद्यालय कल्याणचे संचालक, डॉ.नरेशचंद्र यांनी केले.

विज्ञान प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून वाहतुक व दळणवळण ट्रॅफिक, घनकचरा व्यवस्थापन (कचरा वर्गीकरण), वायु प्रदुषण इ. प्रकल्प सादर करण्यात आले. यामध्ये नागरिकांना भेडसावणा-या समस्यांचे निराकरण कसे करावे, याबाबत उपाययोजना शोधण्याचे सादरीकरण प्रकल्पांच्या माध्यमातून करण्यात आले.

या नाविन्यपूर्ण विज्ञान  प्रकल्पांची पाहणी करताना हे महानगरपालिकास्तरीय प्रकल्प राज्यस्तरापर्यंत जावेत यासाठी डॉ.नरेशचंद्र यांनी विदयार्थी व शिक्षक यांना  शुभेच्छा दिल्या.  तर विदयार्थी हे उदयोगाभिममुख व्हावेत यासाठी अचिव्हर्स महाविद्यालयाचे डॉ.महेश भिवंडीकर  यांनी मार्गदर्शन केले आणि विदयार्थ्यांच्या सद्यपरिस्थितीवर पर्यावरण पुरक प्रकल्प व विदयार्थी कल्पकता यांचे कौतुक केले.

यावेळी  शिक्षण विभागाचे उपआयुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले. विज्ञान प्रदर्शन हे 2 दिवस पालक-विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे.

+