team jeevandeep 13/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : थकीत मालमत्ता कर व पाणीपटटीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अभय योजना २०२४-२०२५ जाहिर केली आहे. या योजनेतंर्गत मालमत्ता कर व पाणीपटटीवर दिनांक १५ जानेवारी, २०२५ पर्यंत १००% शास्ती (दंड/व्याज) व दिनांक १६ जानेवारी २०२५ ते दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ७५% शास्ती (दंड/व्याज) माफी होणार आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. दि.३१ मार्च, २०२५ पर्यंत सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सर्व नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार आहेत. नागरीकांनी आजच आपला मालमत्ता कर आणि पाणीपटटीचा भरणा ऑनलाईन किंवा महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर करावा.
महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांनी दिलेल्या वेळेत कर भरणा करण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. काही मालमत्ताधारक अद्यापही कराचा भरणा करणेस टाळाटाळ करीत आहेत. याबाबत. थकबाकी असलेल्या नागरीकांना विशेष लक्ष केंद्रीत करुन कायदेशीर अटकावणीची कार्यवाही करण्यात येत आहे. अभय योजनेतून मिळणा-या शास्ती (दंड/व्याज) मधील सवलतीचा लाभ जास्तीत जास्त थकीत मालमत्ता कर व पाणीपटटीधारकांनी घ्यावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना करण्यात आले आहे.