Visitors: 389876
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू

  Team jeevandeep       27/05/2025      sthanik-batmya    Share


चार रुग्णांवर उपचार सुरु
नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन
 
Corona 
 
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला असून करोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. चार कोरोना रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे.           
 
      सुत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार गुरुवारी एका 47वर्षीय महिलेला ताप ,येत असल्याने टाईफायड झाल्याने खाजगी रूग्णालयात उपाचार्थ दाखल केले असता शुक्रवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.  शनिवारी कोरोना टेस्ट अवहाल प्राप्त झाल्यावर कोरोना झाला असल्याची महिती समोर आली. सद्यस्थितीत कोरोना बाधित चार रूग्णांना पैकी,  1रूग्ण घरी उपचार घेत असून, दोन कोरोना बाधित रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असून एका कोरोना बाधित रूग्णाला उपाचार्थ कळवा शासकीय रूग्णालयात  उपचार सुरू आहेत.            
 
    या पार्श्वभूमीवर नारीकांनी आरोग्य विषयी सर्तकता बाळगावी असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे. महापालिका हद्दीत कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले.त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाने पुन्हा कल्याण डोंबिवली शहरात शिरकाव केला आहे. या पूर्वी मार्च २०२० मध्ये आलेल्या काेरोना मुळे कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. पहिली, दुसरी आणि तिसरी लाट कोरोनाची आली होती. तिसऱ््या लाटेनंतर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला. त्यानंतर कोरोना दूर पळला होता. आत्ता पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरू शकते. मात्र नागरीकांनी घाबरुन न जाता आरोग्य विषय काळजी घ्यावी. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने महापालिकेने कल्याणच्या रुक्मीणीबाई आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आयसाेलेशन वार्ड सुरु केले आहे. तसेच उद्यापासून कोरोना टेस्टकरीता आरटीपीसी टेस्ट ल’बही सुुरु केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त बोरकर यांनी दिली आहे.
 
उपायुक्त बोरकर यांनी आवाहन केले आहे की, श्वास घेण्यास त्रास झाल्यास, सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा धरणे आदी लक्षणे जाणवल्यास तातडीने संबंधित रुग्णाने नजीकच्या आरोग्य केंद्रात जावे. लक्षणे सौम्य स्वरुपात असली तरी कोरोना टेस्ट करुन घ्यावी. त्याचबरोबर नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे, टाळावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. वेळीच उपचार घेतला तर रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकतो.
 
 
+