Visitors: 229071
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

कृषी विभागाचे सहकार्य, त्याला अडिवली दहिवलीच्या शेतकऱ्यांची समर्थ साथ

  team jeevandeep      22/03/2025      sthanik-batmya    Share


कल्याण:

ऐकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ,या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जेजे शक्य होईल ती ती मदत केली पाहिजे, मात्र मदत करताना आर्थिक हितसंबंध येता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे, आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्ती च्या जीवनात बदल घडवून आणू शकते,नेमकी अशीच घटना कल्याण तालुक्यातील अडिवली -दहिवली शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे, तेही कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या सहकार्याने, त्याला मिळालेल्या शेतकऱ्यांच्या समर्थ साथीने, कष्टाने, जिद्दीने!,आज ऐन कडक उन्हाळ्यात या गावातील३०ते४०एकर क्षेत्र हिरवेगार झाले आहे,

नदी, धरण, तलाव आमच्या उशाला, आणि कोरड पडली घशाला, अशी ओरड आपण नेहमीच ऐकतो, पण यासाठी प्रत्यक्षात कृती करताना, त्याची अमंलबजावणी करताना दिसत नाही, परंतु याला अपवाद ठरली ती कल्याण पंचायत समिती मधील अडिवली, दहिवली ग्रामपंचायत!येथील ऐन विशीतील तरुण सरपंच कमलाकर राऊत, उपसरपंच दर्शन मलिक, सदस्य सोमनाथ सांवत, सुनिता राऊत, दामिनी जाधव, सुखदेव शिद, मिना फसाले, इंदिरा शिद, इत्यादीनी,तडक कल्याण पंचायत समिती गाठली, आणि आपले दु:ख, कृषी विभाग, गटविकास अधिकारी, यांच्या समोर मांडले, तरुण लोकप्रतिनिधी ची गावाप्रती, शेतकऱ्यांप्रती, तळमळ, महत्वकांक्षा, कष्ट करण्याची जिद्द, पाहून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त सीईओ, अजिंक्य,पवार,जिल्हा कृषी विकास अधिकारी,मुनीर बाचोटीकर,जि, प ठाणे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास  अधिकारी,संजय भोये, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी, बाबासाहेब शिंदे, एस एस संत, श्री घोलप, आदींनी या गावास भेटी देऊन, शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन, प्रत्यक्षात काळू नदीवर जाऊन, गावातील१२ते १३शेतकऱ्यांना एकत्र करून प्रती शेतकऱ्यांला ३०हजार रुपये असे सुमारे३लाख ९०हजार रुपये अनुदान देऊन तब्बल८००ते१हजार मीटर पाईपलाईन काळूनदीवरुन करून पाणी शेतावर आणले,

याचा परिणाम, गेली कित्येक वर्षे केवळ भात पिक घेणारे शेतकरी, आता काकडी, चवळी, दुधी भोपळा, मिरची, सिमला, गोसाळी, कारली,अशी वेग वेगळी भाजीपाला पिके घेऊ लागली, कल्याण सारखी मोठी बाजारपेठ जवळ असल्याने आता या शेतकऱ्यांना जवळपास७०/८०हजार केवळ नफा मिळत आहे, वर्षानुवर्षे ओसाड माळरानावर आता हिरवेगार नंदनवन फुलंल आहे, शासकीय अधिका-यांनी ठरवलं, आणि त्याला, नागरिकांची,शेतकऱ्यांची,जनतेची साथ लाभली तर काय?होऊ शकते, याचे ताजे व जिवंत उदाहरण म्हणजे, अडिवली, दहिवली, ग्रामपंचायत होय!

नुकतीच या गावाला, कल्याण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आर के गवारी, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, एस एस संत, विस्तार अधिकारी दिनेश घोलप, पत्रकार संजय कांबळे, आदींनी भेट दिली, यावेळी,ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती माधुरी रोठोड,,उपसरपंच,दर्शन मलिक, जागृती जाधव, दिपाली ठाकरे,राजाराम राऊत, सुभाष सावंत,आदी मंडळी उपस्थित होते, यावेळी गावातील विविध विकास कामे, अंगणवाडी, इत्यादींची पाहणी करण्यात आली

+